क्राईम

बलात्काराच्या गुन्ह्यात ‘तो’ जेलमध्ये गेला; जामीनावर बाहेर येताच तरुणीवर झाडल्या गोळ्या

दिल्ली: दिल्लीच्या वसंत विहारमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बलात्कार पीडित तरुणीला गोळी मारून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. अजुबैर सफी आणि अमन सुखला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मीळालेल्या माहितीनुसार, रेप पीडित महिलेच्या डोक्यात गोळी मारण्यात आली. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या महिलेला गोळी मारण्यात आली, ती एका सलूनमध्ये हेड मॅनेजर म्हणून काम करते. पोलिसांनी म्हटलंय की, ही धक्कादायक घटना बुधवारी घडली. बुधवारी दोन लोक दुचाकीवरून प्रवास करत होते, त्यावेळी त्यांनी महिलेवर फायरिंग केली. महिलेनं बलात्काराची तक्रार दाखल केली.

आरोपी अजुबैर सफी ज्याने महिलेला गोळी मारली होती. त्याच्या विरोधात महिलेनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी रेप केसमध्ये जामीनावर सुटला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने महिलेवर गोळी झाडली. महिलेच्या जबाबाच्या आधारावर वसंत विहार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 अंतर्गत हत्येचा प्रयत्न आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांच्या तपासात आरोपी अजुबैर सफीने म्हटलंय की, महिलेनं त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे तो नाराज होता. त्याने सतत महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने महिलेला गोळी मारली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना सीसीटीव्ही फुटेज आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अटक केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

3 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

3 तास ago