शिरुर (अरुणकुमार मोटे) सविंदणे (ता.शिरुर) येथील सविंदणे-कवठे रस्त्यावरील नरवडे मळा येथे (दि. ६ ) रोजी पहाटे अंदाजे १.३० ते २.१५च्या दरम्यान चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी संभाजी नरवडे यांच्या घराचा दरवाजा ऊचकटून संभाजी नरवडे व त्यांच्या पत्नी बबूबाई नरवडे यांना जबर मारहाण करत बबूबाई यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र, मोहन माळ, जोडवी, कानातील कर्णफुले असा अंदाजे दहा तोळयाचा ऐवज लंपास केला आहे .तसेच घरातील सामानाची उचकापाचक करून करुन घरातील तीन हजार रोख रक्कम घेऊन गेले आहेत.
हे दाम्पत्याच्या घराशेजारी कुठलेही घर नाही. ते दोघेच घरामध्ये राहत होते. मुलगा बाहेरगावी नोकरीसाठी वास्तव्यास आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे हे दाम्पत्य भयभीत झाले आहे. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत संभाजी नानाभाऊ नरवडे (वय ६७) बबुबाई संभाजी नरवडे (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून गावातील नागरीकांनी त्यांना सह्याद्री हॉस्पीटल पुणे येथे घेऊन जात ऊपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे गावातील व परीसरातील नागरीक भयभीत झाले असून विद्युत रोहित्र, विद्युत मोटारी चोरीचे सत्र सुरुच असून आता घरफोड्याही सुरु झाल्या असून पोलिस प्रशासनाने याला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…