मुख्य बातम्या

शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरालगत घोड नदीपात्रात रस्सीने बांधलेल्या अज्ञात तरुणाच्या खूनाचा उलगडा करुन आरोपींना अटक करण्यात शिरुर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले आहे. कृष्णा गोकुळ विघ्ने (वय ३२ वर्ष), रा. आनंदगाव, ता. शिरुर कासार, जि. बीड असे खून झालेल्याचे व्यक्तीचे नाव असुन याप्रकरणी तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.

मयत कृष्णा गोकूळ विघ्ने हा व्यसनी होता. तो कुटुंबात नेहमी जमीन विका असे म्हणून भांडण करत असल्याने आरोपींनी त्याला चारचाकी वाहन महिंद्रा जितो टेम्पो नं. एम. एच. १६ सी. डी. ३६८४ मध्ये आणून त्याचे हातपाय बांधून त्यास शिरुर शहरालगतच्या घोडनदी पात्रात टाकून त्याचा खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

 

याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर परिसरातील पाचर्णे मळा येथील घोडनदीपात्रात रामभाऊ पाचर्णे यांच्या शेताजवळ ३० ते ३५ वर्षाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह मारहाण करत काळया, लाल व पांढऱ्या रंगाच्या दोरीने हातपासुन पायापर्यंत ठिकठिकाणी बांधून घोडनदीत टाकण्यात आला होता. हा मृतदेह बरेच दिवस पाण्यात राहिल्याने मयताचा चेहरा व पूर्ण शरीर विद्रूप झालेले होते.

 

त्यामुळे प्रेताची ओळख पटविण्यासाठी प्रेताच्या अंगावर असलेले कपडे, खिशात मोटर सायकलची चावी तसेच त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाजवळ M असे गोंदलेले होते. यावरुन मयताची ओळख पटविणे अत्यंत आव्हानात्मक असताना केवळ याच पुराव्यांच्या जोरावर राज्यभर पोलिस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या मिसींगच्या तक्रारीचा तपास करुन, आणि वर्तमानपत्रात प्रसिध्दी देवुन, गोपनीय बातमीदारांचा वापर करत शिरुर पोलिसांनी अनोळखी मयत इसमाची ओळख पटवली पोलीस तपासामध्ये मयताचे नांव कृष्णा गोकुळ विघ्ने (वय ३२) रा. आनंदगाव, ता. शिरुर कासार, जि.बीड असे निष्पन्न झाले होते.

 

आरोपी आणि कुटुंबियांची जमीन विक्रीच्या पैशावरुन वाटपावरुन वाद होता. त्या कारणावरुन यातील आरोपी यांनी कृष्णा याला व्यसनमुक्ती केंद्रात नेतो असा बहाणा करत कृष्णाला बांबुच्या दांडक्याने मारहाण करुन त्यास दंडापासुन ते पायापर्यंत दोरीने बांधुन त्यास आनंदगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड येथुन आरोपीच्या गाडीमध्ये घातले व पुणे-नगर रस्त्यावरील शिरुर जवळील सतरा कमान पुलावरून घोड नदीपात्रामध्ये जिवंत टाकुन त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

मयताची ओळख पटल्यानंतर आरोपीच्या शोधाकरिता पोलीसांनी छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर या ठिकाणी वेगवेगळ्या टीम रवाना करून जागोजागी गुन्हयात सहभागी असणारे आरोपी १) अजिनाथ गोकुळ विघ्ने (वय २६) रा. आनंदगाव, ता. शिरुर कासार, जि. बीड २) गणेश प्रभाकर नागरगोजे, (वय २९), रा. पीरसाहेब चौक, निबळक, ता. जि. अहमदनगर, ३) पाडुरंग अर्जुन विघ्ने (वय ५०), रा. आनंदगाव, ता. शिरुर कासार, यांना अटक करण्यात आली आहे.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुरचे पोलिस स्टेशनचे ज्योतीराम गुंजवटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे तसेच शिरुर पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार अरुण उबाळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, विकी यादव, सचिन भोई, संतोष साळुंखे यांनी केली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडी मध्ये असुन पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करत आहेत.

शिरुर; घोडनदी पात्रात रस्सीने बांधलेला अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

1 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

3 दिवस ago

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

3 दिवस ago

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे.…

3 दिवस ago

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

4 दिवस ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

4 दिवस ago