शाळकरी मुलाच्या अंगावर पाणी उडाल्याने घडला प्रकार
शिक्रापूर: आरणगाव (ता. शिरुर) येथील एका महिलेचा मुलगा शाळेत जात असताना सुभाष कोकाटे या व्यक्तीकडून त्याच्या अंगावर पाणी उडाले. त्यामुळे शाळकरी मुलगा कोकाटे यांना काहीतरी म्हणाला. त्यामुळे सुभाष कोकाटे सह त्याच्या चुलत भावाने शाळकरी मुलाच्या घरी जाऊन मुलाच्या आईसह वडिलांना शिवीगाळ दमदाटी करत मारहाण करुन महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुभाष बाळासाहेब कोकाटे व तुषार भाऊसाहेब कोकाटे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आरणगाव (ता. शिरुर) येथील एक शाळकरी मुलगा शाळेत जात असताना शेजारून दुचाकीहून जाणाऱ्या सुभाष कोकाटे याने मुलाच्या अंगावर पाणी उडवले त्यामुळे मुलगा कोकाटे यांस काहीतरी बोलला त्यामुळे कोकाटे याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सायंकाळच्या सुमारास कोकाटे हा सदर मुलाच्या घरी जाऊन मुलाचे आई व वडिलांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरवात केली तसेच मुलाच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरवात केल्याने मुलाची आई मध्ये आली असता सुभाष कोकाटे याने सदर महिलेचा विनयभंग करत मारहाण केली.
दरम्यान सुभाष याचा चुलत भाऊ तुषार कोकाटे हा देखील तेथे आला त्याने देखील महिलेला मारहाण केली सदर मारहाणीमध्ये सुभाष कोकाटे याने काठीने सदर महिलेला मारहाण करत जखमी केले. याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सुभाष बाळासाहेब कोकाटे व तुषार भाऊसाहेब कोकाटे दोघे रा. अरणगाव (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.
मुंबई: बदललेल्या सहकार कायद्याच्या तरतुदींमुळे माजी आमदार राजन पाटील यांना आगामी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, सोलापूर…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ शी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी…
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ वेगाने पुढे जात असताना ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित…
पुणे : ‘संघटित शिल्पकार संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष…
नवी दिल्ली: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून…