क्राईम

जमिनीचा बांध कोरला म्हणून पुतण्याचा केला खून…

जालनाः शेतातील बांध कोरल्याच्या वादावरून चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना जानेफळ दाभाडी या गावात घडली आहे. अंबादास मिसाळ असे मृत पुतण्याचे नाव असून, शिवाजी जयाजी मिसाळ असे आरोपी चुलत्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी मिसाळ आणि त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांचा जमिनीच्या बांधावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दोघांमध्ये शुक्रवारी बांध कोरण्यावरून किरकोळ वाद झाला होता. पण काही वेळात तो मिटला होता. अंबादास मिसाळ यांनी काकाच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली. काकाची समजूत काढल्यावर बाजूलाच असलेल्या घरासमोरील बाजेवर ते झोपले. याचवेळी शिवाजी मिसाळ याने अंबादास मिसाळ यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांच्या मानेवर व गळ्यावर गंभीर वार केले. यामध्ये अंबादास मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाइकांनी अंबादास यांना तत्काळ राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृतघोषित केले. या घटनेची माहीती मिळताच हसनाबाद ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या.

मयताची पत्नी रेखा अंबादास मिसाळ यांच्या तक्रारीवरून संशयित शिवाजी मिसाळ, मंदाबाई शिवाजी मिसाळ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वैशाली पवार या करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

1 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

16 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

16 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

16 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

16 तास ago