शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील टाकळी भीमा रोड नजीक असलेल्या ढमढेरे वस्ती येथील दोन घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील टाकळी भीमा रोड नजीक असलेल्या ढमढेरे वस्ती येथे राहणारे सतीश ढमढेरे हे २६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घरात झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास ते उठले असता त्यांना घरातील कपाट उघडे व साहित्य अस्थाव्यस्थ पडले असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी पत्नीच्या मदतीने कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले, तर सतीश हे बाजर आले असता त्यांच्या घराशेजारील संतोष शिंदे यांच्या घरातील देखील सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले.
याबाबत सतीश दत्तात्रय ढमढेरे (वय ४६) रा. ढमढेरे वस्ती, तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…