शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत येथे महिन्याभरात बिबटयाने दोन जणांचे बळी घेतले आहे. तसेच दोघे जण गंभीर जखमी आहेत. वन विभाग अजून किती जणांचे बळी गेल्यावर जागे होणार? असा प्रश्न येथिल नागरीकांना पडला आहे.
कवठे येमाई, सविंदणे, फाकटे, चांडोह, जांबुत, माळवाडी, सरदवाडी, पिंपरखेड, टाकळी हाजी येथील ग्रामस्थ बिबटयाच्या बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे डॉ. संतोष ऊचाळे यांनी सांगितले. या परिसरात बिबट यांनी धुमाकुळ घातला असून पशुधनाबरोबर नागरीकांनाही तो भक्ष करू लागल्याने नागरीकांमध्ये प्रंचड भितीचे वातावरण पसरले आहे.
उचित कार्यवाहीसाठी जांबुत ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे. तसेच महावितरण विभागाने शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासाठीही तीव्र लढा या भागातील नागरीक करणार आहेत. सोशल मीडियावर तशा चर्चा रंगू लागल्या आहे. सदर घटनेच्या ठिकाणी सोलापूर येथे मोठे अथक परीश्रम घेत नरभक्षक बिबटया ठार केलेले शार्प शुटर डॉ. चंद्रकांत मंडलिक हे घटनास्थळी भेट देणार आहेत.
थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…
केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…