सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधानमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, “हे सरकार शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेले निष्ठूर सरकार आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्यांना लाठ्यांनी उत्तर देणे ही लोकशाहीची गळचेपी आहे,” असा आरोप केला.
वडेट्टीवार म्हणाले की, देशाचे भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करणे कोणत्याही लोकशाहीला शोभणारे नसल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील जंतर-मंतरवर न्याय आणि विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा लोकशाहीवरील काळा डाग असल्याचे सांगत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हमीभाव, वाढता उत्पादन खर्च, बेरोजगारी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील विलंब, शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांचा अभाव या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. “शेतकरी संकटात, विद्यार्थी भविष्याबाबत चिंतेत आणि बेरोजगार युवक रोजगारासाठी भटकत आहे. मात्र सरकारला जनतेच्या प्रश्नांपेक्षा प्रसिद्धीची अधिक चिंता आहे,” असा आरोप त्यांनी केला.
शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा काँग्रेस राज्यभर जनआंदोलन उभारेल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत दिल्लीतील जंतर-मंतरवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…