शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या काठी असेलल्या झाडांचा फायदा घेत देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी छापा टाकत देशी दारुच्या बाटल्या जप्त करत किसन शंकर शिंदे या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या कडेला एक व्यक्ती देशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस हवालदार किशोर तेलंग यांना मिळाली त्यांनतर पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, पोलीस नाईक भास्कर बुधवंत यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता झाडांच्या झुडपांमध्ये एक इसम लोकांना देशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पोलिसांनी त्याला जागेवर पकडत त्याच्या जवळील देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक भास्कर महादेव बुधवंत रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी किसन शंकर शिंदे (वय ४१) रा. सांगवी सांडस ता. हवेली जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…