Categories: इतर

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत मोटारी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना या चोरट्यांचा छडा लावणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेले असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने विद्युत मोटारी चोरणाऱ्यांना जेरबंद करत आरोपींकडून 6 विद्युत मोटार व केबल जप्त करत अक्षय उर्फ बंट्या सुनील थिटे, आदेश सुनील थिटे, सुरज उर्फ मुकेश संतोष सुपेकर यांना अटक केली आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील केंदूर परिसरात विहिरींवरील विद्युत मोटारींच्या चोऱ्यांचे प्रमाणवाढत असताना शेतकरी देखील हवालदिल झालेले असताना विद्युत मोटारी चोरीचे काही गुन्हे दाखल झालेले असताना केंदूर येथील पिंपळ खोरी येथे सुनिल थिटे यांच्या गोठ्यावर चोरीच्या विद्युत मोटारी ठेवल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर यांना मिळाली.

त्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या आदेशानुसार व सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पाबळ औट पोस्टचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर, अनिल ढेकणे, पोलीस नाईक गणेश सुतार, पोलीस शिपाई विशाल देशमुख, राहुल वाघमोडे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता तेथे तीन विद्युत मोटार मिळून आल्या.

पोलिसांनी मोटारीसह संशयित अक्षय उर्फ बंटया सुनिल थिटे व आदेश सुनिल थिटे या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या काही साथीदारांच्या मदतीने परिसरात विद्युत मोटार व केबल चोरी केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी सुरज उर्फ मुकेष संतोश सुपेकर याला देखील ताब्यात घेतले असता त्याच्याकडे देखील काही विद्युत मोटार मिळून आल्या.

दरम्यान तिघांनी देखील त्यांच्या अन्य 3 साथीदारांच्या मदतीने विद्युत मोटारी चोरल्याचे कबुल केले असून पोलिसांच्या पथकाने तिघांकडून चोरीच्या सहा विद्युत मोटार, केबल तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी जप्त केल्या असून यावेळी पोलिसांनी अक्षय उर्फ बंट्या सुनील थिटे (वय २३), आदेश सुनील थिटे (वय 21) व सुरज उर्फ मुकेश संतोष सुपेकर (वय २१) तिघे रा. थिटे आळी केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे यांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

18 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago