crime
औरंगाबाद: गंगापूर तालुक्यात एक वृद्ध महिला तिच्या नातवासोबत राहते. गावातीलच विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुझ्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप करत तिला मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुमच्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्या वृद्ध महिलेला आपल्यासोबत गंगापूर फाट्यावरून, आरोपींनी आपल्या घरी नेले.
वृद्धेला विवस्त्र करून मारहाण…
वृद्ध महिलेला ओझर येथील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. संतापजनक म्हणजे महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला विवस्त्र करत मारहाण करण्यात आली. यावेळी पीडित वृद्ध महिला हात जोडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र आरोपींना तिच्यावर दया आली नाही. अंगावर शहारे आणणारा हा प्रकार तब्बल अर्धा तास सुरु होता.
मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला…
माझ्या मुलीला तुझ्या नातूने पळून नेलं म्हणून, वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्या महिलेचा मारहाण करतानाचा व्हिडिओ ही केला. संतापजनक म्हणजे तयार केलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल सुद्धा केला. त्यामुळे अखेर या सगळ्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…