क्राईम

तळेगाव ढमढेरेत पाटाच्या पाण्याच्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पाटाचे पाणी शेतात सोडल्याच्या वादातून व्यक्तीला मारहाण करत त्याच्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मिना अवधूत भुजबळ, नवनाथ मारुती भुजबळ, ओंकार नवनाथ भुजबळ, अवधूत मारुती भुजबळ, ईश्वर मारुती भुजबळ यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील मंगेश भुजबळ हे त्यांच्या घराचे समोर गुरांना पाणी पाजण्यासाठी गेले असताना शेजारील मिना भुजबळ तेथे आल्या त्यांनी मंगेश यांना पाटाने पाणी का सोडतो, असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी त्यावेळी नवनाथ भुजबळ व ओंकार भुजबळ यांनी सदर ठिकाणी येवून मंगेश यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. यावेळी मंगेशचे आई वडील मंगेशला सोडवण्यासाठी आले असताना त्यांना देखील शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली, तर अवधूत भुजबळ व ईश्वर भुजबळ या दोघांनी देखील तेथे येऊन मंगेश यास तू कसा पोलीस स्टेशनला जातो हे पाहतो असे म्हणून मारहाण केली.

याबाबत मंगेश राजाराम भुजबळ (वय २३) रा. कमेवाडी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मिना अवधूत भुजबळ, नवनाथ मारुती भुजबळ, ओंकार नवनाथ भुजबळ, अवधूत मारुती भुजबळ, ईश्वर मारुती भुजबळ सर्व रा. कमेवाडी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष मारकड हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

2 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

3 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

4 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago