शिरूर तालुका

शिक्रापुरांत पत्रा उचकटून पावणेदोन लाखांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका पत्र्याच्या शेडचा पत्रा उचकटून टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऑफिस मधील तब्बल 1 लाख 78 हजारांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे सुरज धुमाळ यांचे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ऑफिस असून चार एप्रिल रोजी सदर ऑफिस बंद करुन कामगार व धुमाळ घरी गेलेले असताना दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ऑफिस मधील महिला कामगार ऑफिस मध्ये आला असता तेथील लॅपटॉप दिसला नाही. त्यानंतर दुसऱ्या कामगाराने पाहणी केली असता शेजारील पत्रा उचकटलेला दिसून आल्याने ऑफिस मध्ये पाहणी केली असता ऑफिस मधील एक लाख अठ्ठ्याहत्तर हजारांची रक्कम ठेवलेल्या पेट्या देखील गायब असल्याने दिसून आले. त्यामुळे सीसीटीव्हीची तपासणी केली असता एक व्यक्ती पत्रा उचकटून आत मध्ये आल्याचे आणि पेट्या घेऊन जाताना दिसून आले.

याबाबत सुरज मनोहर धुमाळ (वय २९) रा. पाटवस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. पिंपळे खालसा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलीस पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार श्रावण गुपचे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago