शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर बुरुंजवाडी रोडने जाणाऱ्या महिलेला दुचाकीहून लिफ्ट देत महिलेला चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथील शकुंतला वाबळे या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बुरुंजवाडी येथील शेतातून घरी येण्यासाठी रस्त्याचे कडेला उभ्या असताना एक युवक दुचाकीहून आला आणि मी तुम्हाला ओळखतो चला मला पण शिक्रापूरला जायचे, असे म्हणून दुचाकीवर बसवले काही अंतर गेल्यानंतर दुचाकीहून खाली उतरवत चाकू दाखवून वाबळे यांच्या गळ्यातील दीड तोळा वाजण्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.
याबाबत शकुंतला वामन वाबळे (वय ६०) रा. वाबळेवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी अज्ञात युवकावर गुन्हा दाखल केला असुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे पुढील तपास करत आहेत.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…