शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील विद्याधाम प्रशाले शाळेतील खेळाडूंनी जिल्हा व विभाग स्तरावर विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवून राज्य पातळीवर मजल मारली असल्याची माहिती विद्याधाम प्रशालाचे प्राचार्य योगेश जैन यांनी दिली आहे.
शिरुर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेतील वैष्णवी युवराज रासकर हिने विभागीय पातळीवरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रथम मिळवत सुवर्णपदक पटकावले असून तिची राज्य पातळीवर निवड झाली आहे, तर कार्तिक कार्तिक गोरक्षनाथ पुजारी याने जिल्हास्तरीय ओपन एअर रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत विभागीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. कुस्ती स्पर्धेमध्ये समर्थ खेतमाळीस, गवळी रेवननाथ, ढेरंगे प्रताप, येलभर निलेश या खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.
संग्राम शेवाळे याने जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला तर सायली सातव हिची लांब उडी स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर निवड झाली असून नंदिनी गांधी व स्वाती शेडगे यांनी तायक्वांदो कराटे प्रकारात जिल्हा पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला तसेच आफरीन मण्यार, फलके गौरी व कार्तिक पुजारी यांची कराटे क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर निवड झाली असून अशा पद्धतीने विद्याधामच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश संपादित केले आहे.
सर्व खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख सचिन रासकर, क्रीडा स्पर्धा प्रमुख बारकू येवले, क्रीडा शिक्षक भाऊसाहेब करंजुले, मच्छिंद्र बनकर, हरी पवार, संतोषकुमार देंडगे, संदीप तानवडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले, तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, प्राचार्य योगेश जैन, उपप्राचार्य प्रकाश कल्याणकर, पर्यवेक्षक बाबुराव कोकाटे, निळकंठ देवळालीकर यांसह आदींनी अभिनंदन केले आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…