पुणे: पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीय. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेनं आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पती आणि सासूला अटक करण्यात आलीय. राणी भागवत कदम असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राणीचा पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम हे दोघेही जाच करत होते. राणीचा गेल्या काही दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती तिच्याशी वाद घालायचा. तिला घरात कोंडून ठेवणं, उपाशी ठेवणं आणि मारहाण करणं असे प्रकार होत होते.
पती आणि सासूकडून होणाऱ्या त्रासाला राणी कंटाळली होती. मानसिकदृष्ट्या खचलेल्या राणीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
राणीने सासरच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. या प्रकरणी पती भागवत कदम आणि सासू मुक्ता कदम यांना अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर पत्नीचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…