मुंबई: सध्याच्या काळात आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. गोरेगाव येथील एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी खाऊन १७ वर्षाच्या विद्यार्थिनीने तीच आयुष्य संपवलं आहे. पीडित मुलगी ही मुंबईतील एका नामांकित शाळेमध्ये शिकत होती. तिने आत्महत्या केल्यामुळ एकच खळबळ उडाली आहे.
मुलगी कोठे राहत होती
पीडित मुलगी ही मुंबईतील आरे कॉलनी परिसरातील ओबेरॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये राहत होती. मुलीचे वडील व्यावसायिक होते. मुलगी मुंबईतील महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकत होती. अभ्यासात हुशार असलेल्या मुलीवर तिच्या अभ्यासाचं मोठं दडपण होत. ती अनेक दिवसांपासून आजारी होती, तिच्यावर धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
गुरुवारी दुपारी केली आत्महत्या
गुरुवारी दुपारी मुलगी तिच्या खोलीमध्ये होती. तिने अचानक २३ व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आहे. यावेळी मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले होते. त्यांनी ताबोडतोब मुलीच्या घरच्यांना कळवले. पण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत मुलगी मृत झाली होती. या घटनेमुळे तिच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वडिलांचा नोंदवला जबाब
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ मुलीच्या घरी भेट दिली. येथे गेल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला. त्यांनी आपली मुलगी अभ्यासाच्या टेन्शनमुळे दबावात होती असं सांगितलं आहे. मुलीच्या घरच्यांनी कोणावरही संशय व्यक्त न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. बॉडीचे शवविच्छेदन करून कुटुंबाच्या हवाली करण्यात आली.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…