क्राईम

छत्रपती संभाजीनगरला मित्राच्या वडिलाचा चाकू भोसकून खून, आरोपीही जखमी…

औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील टाकळी गावात दोन सख्ख्या भावांनी क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती, आता पुन्हा पैशाच्या व्यवहाराच्या वादातुन मित्राच्या वडिलांचा भर रस्त्यावरच चाकूने भोसकून खून केल्याचा घटना म्हणजेच शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास टाऊन हॉल परिसरात घडली असून कैलास रामचंद्र वाकेकर (४७, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) असे मृताचे तर अजय काशीनाथ चव्हाण (२५, रा. पेठेनगर, भावसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत कैलास यांच्या दोन्ही मुलांसोबत आरोपी अजय चव्हाण याची मैत्री आहे. कैलास वाकेकर हे रंग देण्यास इतर प्रकारचे काम करून उदारनिर्वाह करीत होते. तर अजय चव्हाण हा सुद्धा रोजंदारीवर काम करीत होता. त्याचा कामावर जाण्या-येण्याचा मार्ग टाऊन हॉल परिसरातुन होता. शुक्रवारी तो घराकडे जात असताना रस्त्यावरच कैलास वाकेकर यांच्यासोबत पैशाच्या व्यवहारातुन दोघात वाद सुरू झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, अजयने त्यांना रस्त्यावर पाठीमागून चाकूने भोसकले. त्यात कैलास रस्त्यावरच कोसळले. तेव्हा घटनास्थळावर आरोपी अजय यासही बेदम मारहाण करण्यात आली.

गंभीर जखमी कैलास यांना घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी मृत घोषीत केले. त्यानंतर जखमी आरोपीलाही उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

19 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago