शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या तिघा व्यक्तींचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आठवडे बाजारात भिकाजी राजगुरू, असाराम नरवडे, राजेश गौड हे वेगवेगळ्या पद्धतीने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले असताना बाजारात खरेदी करत असताना त्यांचे मोबाईल त्यांनी खिशात ठेवलेले होते. काही वेळाने त्यांचे मोबाईल खिशात नसल्याचे त्यांच्या निदर्शास आले. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले, तर बाजारातून एकाच वेळी तीन लोकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटनेने बाजारासह परिसरात खळबळ उडाली.
याबाबत भिकाजी सावळेराम राजगुरू (वय ४९) रा. करंजेनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे हे करत आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…