क्राईम

पाबळमध्ये घरात घुसून महिलेचे मंगळसूत्र लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे रात्रीच्या सुमारास महिलेच्या घरात घुसून महिलेला दमदाटी करत महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई पिंगळे घरात झोपलेल्या असताना रात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती लघुशंकेसाठी बाहेर आले असताना एक चोरटा घरात घुसला त्याने लक्ष्मीबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यावेळी लक्ष्मीबाई आरडाओरडा करु लागल्या असताना त्यांना ओरड्ल्यास मारेल, अशी धमकी देत त्यांचे मंगळसूत्र ओढून घेतले आणि घरातून बाहेर जाताना घराला कडी लावली. यावेळी लक्ष्मीबाई यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील गोविंद पिंगळे हे बाहेर आले असता लक्ष्मीबाई यांच्या घरा समोरुन तीन युवक पळून जाताना दिसून आले.

याबाबत लक्ष्मीबाई चंद्रकांत पिंगळे (वय ६५) रा. माळवाडी पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात तीन युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago