पाबळ (सुनिल जिते): पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ६) व गौरी राजू जाधव (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत.
पाबळ येथील एका वीटभट्टीवर कामासाठी असलेल्या अहिला उर्फ भाग्यश्री व राजू जाधव या दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होत असल्याने भाग्यश्री ही मानसिक त्रासाला कंटाळली होती. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल व आजदेखील या दाम्पत्यामध्ये भांडण झाले होते. आज सकाळच्या सुमारास भाग्यश्री ही आपल्या दोन्ही लहान मुल सोबत घेऊन सायकलवर घराबाहेर पडली. मात्र, दुपारपर्यंत….. घरी न परतल्याने पती राजू याने आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या परमेश्वर पिंगळे यांच्या विहिरीजवळ सायकल व भाग्यश्री आणि तिच्या मुलांच्या चपला आढळून आल्या. त्यानंतर पतीने आरडाओरडा करीत स्थानिकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर, विशाल देशमुख, गणेश येळवंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांच्या मदतीने विहिरीतून महिलेसह दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेत अहिला उर्फ भाग्यश्री जाधव, तिचा सहा वर्षांचा मुलगा सार्थक व चार महिन्यांची मुलगी गौरी हे तिघे (सध्या रा. पाबळ ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. बीबी ता. लोणार, जि. बुलढाणा) यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मृत भाग्यश्रीची बहीण जयश्री सुनील जाधव (वय ३५, सध्या रा. एकेरी माळ, पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. खडकी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी राजू पांडुरंग जाधव (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…