शोकसभेत आठवणींच्या भावनांचा फुटला बांध
शिरूर (सुनिल जिते): उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार (ता.०१) शिरूर येथे शोकसभा पार पडली.शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला आणि जनतेसाठी अखंड झटणारा नेता गमावला असून शिरूरसाठी ही हानी असल्याची भावना शिरूर गटसचिवाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
अजित पवार यांचे निधन अत्यंत दुःखद व वेदनादायक आहे. त्यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्राने एका संवेदनशील नेत्यास गमावले असून सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,’ अशी शिरूर तालुक्यातील संस्थेच्या विविध कार्यकारी सोसायटीत काम करणाऱ्या सचिवांनी भावना व्यक्त केली आहे.
‘अजितदादा हे सहकार चळवळीशी जोडलेले होते. सहकारी साखर कारखाने, बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी संस्था आणि कृषी आधारित सहकारी संस्थांमध्ये त्यांची भूमिका नेहमीच प्रभावी राहिली होती.विविध कार्यकारी संस्थेत काम करणाऱ्या सचिवांना दादांनी नेहमी योग्य न्याय दिला.सोसायटी सचिवाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, शिरूरचा नियोजनबद्ध विकास, पायाभूत सुविधा, औद्योगिक वाढ तसेच जीवनमानात नागरिकांच्या झालेला सकारात्मक बदल हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा ठसा आहे. यावेळी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून अजित पवार यांना आदरांजली वाहिली.
त्यांच्या विचारांचा आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी शिरूर तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार,सचिव कैलास लोहार, अनिल वाबळे, सुभाष सातकर, खंडू जगताप, सुखदेव खर्डे यांनी भावना व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला. तसेच शिरूर तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थेवर काम करणारे सर्व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…
मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…