क्राईम

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर पादचाऱ्याला मोटारसायकलने धडक दिल्याने गंभीर जखमी

चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर एका मोटारसायकलस्वाराने निष्काळजीपणामुळे पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याची घटना घडली असून, या प्रकरणी मोटारसायकल चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सचिन विलास इचके (वय ३०) रा. वडगाव रोड, माऊली फॅब्रिकेशनजवळ, आळंदी ता. खेड, मूळ रा. इचकेवाडी, (ता. शिरूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७:३० वाजता ते आणि त्यांचा मित्र योगेश विठ्ठल ननवरे पायी चालत कवठे यमाई येथून इचकेवाडीच्या दिशेने जात होते. वाटेत पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एमएच १२ आर.डी.२२१२ क्रमांकाच्या मोटारसायकलने योगेश याला जोरात धडक दिली.या अपघातात योगेश ननवरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सदर मोटारसायकल प्रशांत प्रकाश इचके (रा. इचकेवाडी, ता. शिरूर) हे चालवत होते. त्याने वेगमर्यादा व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४९९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(८) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास टाकळी हाजी आऊट पोस्ट चे पो.हवा. बनकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

20 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

20 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

1 दिवस ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

1 दिवस ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

1 दिवस ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

1 दिवस ago