क्राईम

कोरेगाव भीमात गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील खलसे वस्ती येथे गावठी दारु अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत सदर ठिकाणची गावठी दारु जप्त करत दारु विक्री करणाऱ्या सुमन दशरथ खलसे या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील खलसे वस्ती येथे एक महिला गावठी दारुची विक्री करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, अविनाश थोरात, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, विकास पाटील, निखील रावडे, महिला पोलीस नाईक राणी भागवत यांसह यांनी सदर ठिकाणी जात छापा टाकला असता त्यांना एक महिला नागरिकांना गावठी दारू विक्री करत असल्याचे दिसून आले. मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच महिला पळून जाण्यात यशस्वी झाली. यावेळी पोलिसांनी सदर ठिकाणी मिळून आलेले गावठी दारुचा लहान ड्रम जप्त केला.
याबाबत महिला पोलीस नाईक राणी पंढरीनाथ भागवत (वय ३०) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सुमन दशरथ खलसे रा. खलसे वस्ती कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे या महिलेच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

12 तास ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

14 तास ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

17 तास ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

18 तास ago

Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…

21 तास ago

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

1 दिवस ago