शिरूर तालुका

शिरुर येथे शिवसेनेच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

शिरुर (तेजस फडके) अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या विरोधात शिरुर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने राज्यपालांचा निषेध करण्यात आला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी दुधाचा अभिषेक घालुन राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याआधीही वारंवार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल आणि वादग्रस्त विधाने केलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत असुन महापुरुष हे आमची अस्मिता आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण राज्यपाल यांच्या पदाचा आदर करतो. पण त्यांनी त्या पदावर असताना बेजबाबदारपणे केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो असे शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा सल्लागार विजया टेमगिरे, तालुका संघटीका चेतना ढमढरे, उपतालुकाप्रमुख अनिल पवार, युवासेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, विभागप्रमुख अनिल लोंढे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशालबापू गाडे, उपविभागप्रमुख पंकज शेळके, शिवसैनिक तुकाराम चौधरी तसेच अनेक शिवभक्त आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

2 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago