पुणे: गाडीची चावी न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने दुसऱ्याच्या छातीत जोरात ठोसा मारल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवार (दि.६) सायंकाळी लोहियानगर परिसरात घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सागर राजू अवघडे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सूरज नंदू सकट (वय २४, रा.लोहियानगर) याला खडक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि सूरज हे नातेवाईक असून, मोलमजुरी करत होते. गाडीची चावी न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. वादाच्या रागातून सूरजने सागरच्या छातीत ठोसा मारला. यात सागर बेशुद्ध झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करून सूरज याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…