महाराष्ट्र

शिक्षक भरती घोटाळा! राज्यात ‘एसआयटी’कडून बोगस शिक्षक भरती केल्या प्रकरणाची चौकशी सुरू

मुंबई: बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती केल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने ‘विशेष चौकशी पथका’ची (एसआयटी) स्थापना केली आहे. हे पथक नागपूरसोबतच नाशिक, जळगाव, मुंबई आणि मराठवाड्यातील बीड व लातूर येथील शिक्षक भरतीची चौकशी करणार आहे.

नागपूर विभागात काही दिवसांपूर्वी बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा उघडकीस आला. अपात्र शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करून वेतन अदा करण्यात आले. बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती प्रकरणी शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांना अटकही झाली. या प्रकरणात चौकशीसाठी राज्य सरकारने आता ‘एसआयटी’ नेमली आहे. पुणे येथील विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नियुक्त करण्यात आली असून, यात पोलिस महानिरीक्षक मनोज शर्मा, शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक हारुण आतार यांचा समावेश आहे. विशेष चौकशी पथकाला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. पथक मराठवाड्यातील बीड, लातूर आदी जिल्ह्यांतील २०१२ पासून ते आजतागायत प्रकरणांची चौकशी, तपास करणार आहे. सरकारच्या या निर्णयाने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आजपासून अधिकारी रजेवर

राज्यातील शिक्षण विभागातील राजपत्रित अधिकारी शुक्रवार, आठ ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजेवर जाणार आहेत. शिक्षणाधिकारी, उपसंचालक, वेतन अधीक्षक असे एक हजार अधिकारी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे अधिकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय विनाचौकशी अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी सरकारने द्यावी, अशा विविध मागण्या संघटनेच्या आहेत.

तीन महिन्यांत अहवाल

पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील तपास पथक २०१२पासून झालेल्या शिक्षक नियुक्त्यांची चौकशी करणार आहे. तीन महिन्यांच्या आत आपला तपास अहवाल समिती सरकारला सादर करणार आहे. समितीला चौकशीसाठी आवश्यक मनुष्यबळ व तांत्रिक साह्य पुरविण्याची जबाबदारी शिक्षण आयुक्त पुण्याच्या यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

मान्यता, बदली तपासणार

सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवासातत्य, विना अनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी पथकाकडून केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर आता मराठवाड्यातील शिक्षक भरतीही रडारवर आल्याची चर्चा आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

5 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

5 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

18 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 दिवस ago