क्राईम

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघातात तरुण डॉक्टरचा मृत्यू…

शिरूर: पुणे-नगर महामार्गावरील रांजणगाव गणपती येथे भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत डॉ. श्रीकृष्ण विष्णू कांदे यांचा मृत्यू झाला असून, डॉ. श्रीकांत बाजीराव शिवले हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कार चालक विद्यानंद सदाशिव राऊत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. श्रीकृष्ण कांदे आणि डॉ. श्रीकांत शिवले हे दोघे एम एच ०२ सी वाय ०७२६ या दुचाकीवरून अहिल्यानगरकडे जात होते. हॉटेल अमर इन जवळ दुभाजकातून वळण घेत असताना पाठीमागून आलेल्या एम एच १२ वाय डी ३९३६ या कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉ. श्रीकृष्ण विष्णू कांदे (वय २६, रा. संकल्प सिटी, रांजणगाव) यांचा मृत्यू झाला आहे. डॉ. श्रीकांत बाजीराव शिवले (वय ३४, रा. नवी सांगवी, पिंपरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत डॉ. सौरभ भालचंद्र लोणकर (वय २७, रा. बारामती) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कार चालक विद्यानंद सदाशिव राऊत (सध्या रा. लोणीकंद, मूळ रा. वाशीम) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मारुती पासलकर करत आहेत.

शिरूर शहर परिससरातील रस्त्यांवर अपघातांचा धुमाकूळ, सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात

शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…

शिरूर शहर व तालुक्यात बेकायदा गतीरोधकांचा हैदोस; अपघातांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये संताप

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू, दोन चिमुकले जखमी…

शिरूर येथे भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago