महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; सुनेत्रा पवार यांच्या नावाला पुण्यातून एकमताने पाठिंबा

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया अखेर सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अध्यक्ष निवडीचा औपचारिक कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार, राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाल्यास पक्षाच्या अधिकृत यंत्रणेला ठरावाद्वारे नव्या अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्या नावाचा पहिला अधिकृत ठराव पुण्यातून संमत करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात आला आहे. अध्यक्षपदासाठी यापूर्वी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र पुण्यातून सुनेत्रा पवार यांच्या नावाला अधिकृत पाठिंबा मिळाल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.

महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ॲड. नीलेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी ही बैठक पार पडली. बैठकीस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, असा ठराव ॲड. निकम यांनी मांडला.

माजी महापौर व नगरसेविका वैशाली बनकर यांनी या ठरावास अनुमोदन दिले. एकूण २३ नगरसेवकांनी ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या, तर दोन नगरसेवक न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनुपस्थित होते. हा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती ॲड. निकम यांनी दिली.दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असून, फेब्रुवारीच्या अखेरीस पक्षाला नवे राष्ट्रीय नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

7 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

8 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

8 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

8 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

8 तास ago