शिरूर (अरुणकुमार मोटे) : पुणे-अहमदनगर महामार्गावरील कारेगावजवळील फलके मळा चौकात (ता. शिरूर) मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर तिचे दोन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने स्कुटीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
आरती गणेश सावंत (वय ३३, रा. गंगा फेज ३, जुडिओ मॉल पाठीमागे, बाबुराव नगर, शिरूर) या आपल्या दोन मुलांसह एक्टिवा स्कुटीवरून जात होत्या. त्यांच्या वाहनाला भरधाव वेगाने आलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पो (क्रमांक MH15 GV 7182) ने फलके मळा चौकाजवळ पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात आरती सावंत यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांचा मुलगा स्वराज गणेश सावंत (वय १५) व मुलगी स्वराली गणेश सावंत (वय १२) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शिरूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी सिद्धार्थ इंद्रभान गिरमकर (वय २८, रा. उरळगाव, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. चव्हाण करीत आहेत.
अपघातग्रस्त चौकाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप…
फलके मळा येथील महामार्गावरील हा चौक गेल्या काही काळात अपघातांची ‘हॉटस्पॉट’ ठरला असून, याआधीही या ठिकाणी अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अपघाताच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी चौकाची रचना सुधारावी, वेग मर्यादा नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात तसेच वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभाराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून या धोकादायक चौकाची पुनर्रचना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
Video: शिरूर तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमणारः संदीपसिंग गिल
मलठणमध्ये भीषण अपघात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक अपघातस्थळावरून फरार
शिरूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी अपघातात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
शिरूर तालुक्यात अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत चालकाला अटक
शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…