आरोग्य

गाढ झोप येण्यासाठी उपाय

रात्री बराच वेळ झोप येत नाही? झोपेचे काही नियम आहेत, ज्याने गाढ झोप येईल, अलार्म शिवाय उठाल. झोपेत अनेक नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी वाढवू शकता. अलार्म लावून सकाळी उठणं हा जीवन जगण्याचा चांगला मार्ग नाही. अनेक जण सकाळी उठल्या नंतर कारण नसताना दुखी होतात, म्हणजेच रात्री अतिविचार केला असणार. यामुळे मानसिक नाही तर शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. जर असं होत असेल तर झोपण्या आधी काही गोष्टी करायला हव्यात, जेणेकरून चांगली झोप येईल.

1) मांस किंवा फॅट्सयुक्त जेवण खात असाल तर झोपण्याच्या २ ते ३ तास आधी खा. जेणेकरून त्याचे चांगले पचन होईल. झोपण्या आधी पाणी पिऊन नंतर झोपायला जा. ज्यामुळे फ्रेश वाटेल आणि झोप पूर्ण होईल.

2) झोपण्याच्या आधी अंघोळ करा. असे केल्याने शरीर निरोगी राहते. रात्री कोमट पाण्याने अंघोळ करा. अंघोळी नंतर १० ते २० मिनिट किंवा अर्ध्या तासाने झोपलात तरी चालेल. यामुळे चांगली झोप येईल. अंघोळ केल्याने त्वचेची स्वच्छता तर होतेच, शिवाय मनही चांगले राहते.

3) झोपण्याआधी जैविक तेलाचा दिवा लावा. ऑलिव्ह ऑईल, लिनसिड ऑईल अशा कोणत्याही प्रकारचा दिवा लावू शकता. ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी एक छोटा दिवा लावा. रात्री झोपताना अंथरूणात बसून योगाभ्यास किंवा ध्यान करा.

4) झोपताना डोकं उत्तर दिशेला ठेवू नका. ज्यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्त हळूहळू डोक्याच्या दिशेला जाते. मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

5) तुम्ही नश्वर आहात हे लक्षात ठेवा. झोपण्याच्या आधी अंथरूणात बसून विचार करा. तुम्ही आज जे केलं ते सार्थक आहे का, तुम्ही काही चुकीचे तर नाही करत आहात ना. याचा विचार करा. मी २४ तासात जे केलं ते सार्थक आहे का. असा प्रश्न स्वत:ला विचारा.

6) अलार्मचा वापर करू नका. यामुळे दिवसाची आणि भविष्याची दिशा ठरत असते. तुम्ही ज्या पध्दतीचे जेवण करता त्या प्रमाणे झोपेची वेळ ठरवा.

7) उजव्या कुशीवर झोपा. ज्यामुळे चांगली झोप येईल. जेव्हा शरीर आराम करते तेव्हा मेटाबॉलिक स्थिती मंद होते.

8) सकाळी उठल्या नंतर हात एकमेकांवर घासून डोळ्यांना लावा. यामुळे शरीर लवकर जागते.

9) सकाळी उठताना आनंदाने उठा. प्राकृतिक कारणांमुळे अनेक जणांचा जीव जातो. जर तुम्हाला दुसरा दिवस पाहायला मिळाल तर तुम्ही जीवंत आहात याचा आनंद ठेवून चेहऱ्यावर हास्य ठेवा.

10) झोपेतून उठताना नेहमी उजव्या बाजूनेच उठा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

13 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

1 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago