क्राईम

एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू

सातारा: सातारा शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी 4 वाजता एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला धारदार चाकू लावत खळबळ उडवून दिली. एक हात मुलीच्या गळ्यात होता, तर दुसर्‍या हाताने चाकू उगारत तो मुलीला जीवे मारण्याची धमकी देत होता.

तो कोणालाही पुढे येऊ देत नव्हता. मुलीच्या गळ्यावर चाकू लावल्यामुळे बघणारे काहीही करू शकत नव्हते. त्याचवेळी पाठीमागून एकाने झडप घालून त्याला पकडले. त्यानंतर जमावाने त्या मुलाला बेदम चोप दिला.

अधिक माहिती अशी, संशयित मुलगा गेल्या काही महिन्यांपूर्वी बसाप्पा पेठेत राहत होता. त्यावेळेपासून तो अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी मुलाला समज दिली होती. त्यानंतर सुरुवातीला मुलाने मुलीला त्रास दिला नाही. मात्र, सोमवारी अचानक याप्रकरणाचा हायहोल्टेज ड्रामा सातारकरांनी पाहिला. संशयित मुलगा दुपारपासून मुलगी राहत असलेल्या बिल्डिंगखाली घुटमळत ती शाळेतून येण्याची वाट पाहत होता. मुलगी येताच मुलगा तिच्याजवळ गेला.

मुलगी घाबरून आरडाओरड करत असतानाच मुलाने धारदार चाकू काढून तो उजव्या हातात घेतला, तर डाव्या हाताने मुलीचा गळा आवळला. यामुळे मुलीला सुटका करून घेणे अशक्य झाले. चाकू पाहून मुलगी गर्भगळीत झाली. दरम्यान, अचानक आरडाओरडा झाल्याने नागरिक परिसरात गोळा झाले. यावेळी संशयित मुलगा कोणालाही जवळ येवू देत नव्हता. मुलीला चाकू लावल्याचे पाहून मुलीचे कुटुंबिय हादरुन गेले. परिसरातील महिलाही घाबरुन गेल्या.

जमाव वाढत असल्याचे पाहून मुलगा सर्वांना तेथून जाण्यास बजावत होता. सर्व जमाव व ती मुलगी मुलाला शांत होण्यास सांगत होती. मात्र संशयित मुलगा कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यादरम्यान या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना समजली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 15 मिनिटानंतर जमावातील एकाने व पोलिसांनी मुलाचा ताबा मिळवत मुलीची सुटका केली. यानंतर संतप्त बनलेल्या जमावाने मुलाची यथेच्छ धुलाई केली. या घटनेनंतर पोलिस व्हॅनमधून संशयित मुलाला तेथून उपचाराला रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

सातारा शहरचे पोलिस सागर निकम, धीरज मोरे, उमेश अडागळे हे घटनास्थळी पोहोचले. संशयित मुलगा मात्र काही केल्या कोणाचे ऐकत नव्हता. त्यावेळी परिसरातील एका युवकाने बिल्डिंगच्या पाठीमागील बाजूच्या गेटवरून उडी मारली. पाठीमागून हळूच त्याने संशयित मुलाला धरताच जमाव तुटून पडला. मुलीची सुटका होताच संशयित मुलाला जमावाने तुडवला. या झटापटीत एकाच्या हाताला चाकू लागला असून, युवक जखमी झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

10 तास ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

10 तास ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

17 तास ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

17 तास ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

17 तास ago

५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा! फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळांचे खुले आव्हान

महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…

17 तास ago