क्राईम

शिक्रापुरातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजकीय नेत्यांच्या आश्रयाला

पाच महिने उलटून देखील आरोपी पोलिसांना सापडेना

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गंभीर गुन्हे वारंवार घडत असताना काही गुन्ह्यातील आरोपी अनेक दिवस पोलिसांना सापडत नसल्याचे दिसत असून सध्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजकीय नेत्याच्या आश्रयाला असल्याचा व्हिडिओ काही नागरिकांना प्राप्त झाला असल्यामुळे शिक्रापुरातील आरोपी राजकीय नेत्याच्या आश्रयाला असल्याचे दिसत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एप्रिल २०२२ रोजी काही युवकांनी एका ठेकेदाराचे अपहरण करत ठेकेदाराकडून 2 लाख रुपयांची खंडणी उकळली होती. दरम्यान सदर ठेकेदाराला दमदाटी करत तू जर पोलिसांत गेला तर बाहेर आल्यावर तुला खल्लास करुन टाकू, अशी धमकी दिली होती.

याबाबत सदर ठेकेदाराने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले असताना पोलिसांनी तीन युवकांवर गुन्हे दाखल केले त्यांनतर काही दिवसांनी 2 आरोपींना जेरबंद केले. परंतु सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी 5 महिने उलटून देखील पोलिसांना सापडत नसल्याचे पोलीस सांगत आहेत.

सदर आरोपी अनेकदा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये फिरत असून काही कार्यक्रमांमध्ये देखील उपस्थित असतो, तर सध्या राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्या सोबत सदर आरोपी एका ठिकाणी उपस्थित असल्याचा व्हिडिओ देखील काही युवकांच्या मोबाईल मध्ये आला आहे. त्यामुळे सदर आरोपी नेत्याच्या आश्रयाला असल्याचे उघड होत आहे. मात्र पोलीस सदर आरोपींला शोधण्याची तसदी देखील घेत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खंडणीचे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींचा आम्ही शोध घेतला. मात्र तो मिळून आलेला नाही, त्याचा शोध अजूनही घेत असून नागरिकांना कोठे आरोपी दिसल्यास नागरिकांनी आम्हाला कळवावे माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल, असे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

8 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

9 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

12 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

12 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

12 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

12 तास ago