क्राईम

पाबळ मध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे एका महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील दिपक चव्हाण यांची पुतणी नीलम जाधव काही कारणास्तव माहेरी आलेली होती. (दि. १२) सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास नीलम घरात असताना तिला आवाज देऊनही ती दरवाजा उघडत नसल्याने शेजारील नागरिकांनी घराचा दरवाजा उघडला असता नीलन हिने गळफास घेतल्याचे दिसून आले.

यावेळी नागरिकांनी तिला उपकारासाठी जवळील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी नीलम विवेक जाधव (वय १९) रा. निमोणे (ता. शिरुर) जि. पुणे हिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याबाबत दिपक कोंडीबा चव्हाण (वय ३६) रा. पाबळ राजवाडा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

21 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago