क्राईम

शिरूर तालुक्यात फायनान्सच्या हप्त्यावरून युवकाच्या डोक्यात फोडली बाटली…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथील एका युवकावर मोटरसायकलच्या फायनान्सचा हप्ता न भरल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना शिरूर शहराच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी किरण सावळा फुलारे (वय २३, व्यवसाय नोकरी, रा. आंधळगाव ता. शिरूर यांनी फिर्याद दिली आहे. जाधव ( पुर्ण नाव माहीत नाही ) व त्याच्यासोबत असलेल्या तीन अनोळखीं विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास शिरूर गावाच्या हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या सुनील वडेवाले जवळ किरण फुलारे उभे असताना आरोपी जाधव व अन्य तिघांनी त्यांच्याकडे मोटरसायकलच्या फायनान्सचा हप्ता न भरल्याचे कारण काढून शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. त्यानंतर चौघांनी मिळून त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

या वेळी आरोपी जाधव याने फिर्यादीच्या डोक्यात काचेची बाटली फोडून गंभीर दुखापत केली, तर एका अनोळखी इसमाने हातात दगड घेऊन त्यांच्या उजव्या खांद्यावर मारून जखमी केले. या हल्ल्यात किरण फुलारे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार उमेश भगत हे करीत आहे.

शिरूर तालुका हादरला! दिव्यांग मुलीच्या शरिराचे तोडले लचके…

शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; तुझा कार्यक्रम करतोच…

मी इथला भाई आहे… म्हणत रस्त्याच्या कामात दोन लाखांची खंडणी; तडीपार गुन्हेगाराची शिरूरमध्ये दहशत

शिरूर तालुक्यातील मेंढपाळ कुटुंबाला आंबेगाव तालुक्यात बेदम मारहाण…

शिरूर! शिक्षिकेचा पती पालकावर भडकला; पाहा दोन्ही Video…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

16 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago