मंचर (कैलास गायकवाड): मेंढपाळ कुटुंबाला आमच्या भागात मेंढ्या चारायच्या नाहीत. तलावाकडे बकऱ्या घेऊन यायच्या नाहीत, असे म्हणून मारहाण केल्याप्रकरणी मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील पाच जणांवर पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायडाबाई लहानू कोळपे (राहणार शिंदेवाडी मलठण तालुका शिरूर) यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
बायडाबाई लहानू कोळपे यांचे कुटुंब सध्या मांदळेवाडी येथे वास्तवास आहे. दि. १८ गुरुवारी दुपारी एक, च्या सुमारास कोळपे कुटुंबीय मांदळवाडी-पिंपळवाडी रस्त्यावरती मेंढ्या चारत रस्त्याने जात होते. पोपट चंदर आदक, संस्कार पोपट आदक, सुनिता पोपट आदक, चंदर नारायण आदक व एक अल्पवयीन मुलगा. (सर्व राहणार मांदळेवाडी) या सर्वांनी कोळपे कुटुंबाला अडवून तलावामध्ये बकऱ्यांना पाणी पाजायचे नाही व मेंढ्या येथे चारू नका असे म्हणत पोपट चंदर आदक याने लहानु कोळपे यांच्या कपाळावरती कुऱ्हाड मारून जखमी केले. तसेच इतर आरोपींनी दगड मारत शिवीगाळ व दमदाटी केली.
सुनिता पोपट अदक हिने बायडाबाई लहानू कोळपे व तिची मुलगी गऊबाई रामदास शिंदे हिला खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व पुन्हा या ठिकाणी मेंढ्या चारायला यायचे नाही, असे म्हणत दमदाटी केली. पुन्हा आले तर तुम्हाला जिवे मारून टाकू अशी धमकी दिल्याचे तक्रारदार बायडाबाई लहानु कोळपे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लोकरे करत आहेत.
मी इथला भाई आहे… म्हणत रस्त्याच्या कामात दोन लाखांची खंडणी; तडीपार गुन्हेगाराची शिरूरमध्ये दहशत
शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…
शिरूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला घरफोडी प्रकरणातील चोरटा…
शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारच्या धडकेने चिमुकली उडाली चेंडूसारखी…
शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची अश्लील चाळे; कारवाईची मागणी…