bride
शिरूर (तेजस फडके) सध्या उपवर मुलाला लग्नासाठी मुलगी शोधने हे महाकठीण झाले आहे. त्यात काही मध्यस्तामार्फत लग्न जमवावी लागतात. नुकताच शिरूर तालुक्यात एक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. परंतु नवरी सासरी आल्यानंतर लग्नाच्या मध्यरात्रीच नवरीने लाखो रुपयांचे दागने घेऊन धूम ठोकली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आले आहे.
शिरूर तालुक्यातील तांदळी येथे हि घटना घडली आहे. तांदळी येथील एका कुटुंबाने मध्यस्थाच्या मदतीने मुलाचे लग्न जमवले होते. यासाठी त्या मध्यस्थ व्यक्तीने वरपित्याकडून दोन लाख रुपये रोख घेतले होते. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रमही नगर येथील एका हॉटेलमध्ये पार पडला होता. दोन्ही कुटुंबात ठरल्याप्रमाणे तांदळी येथे लग्न सोहळा पार पडला होता. गावकरीही मोठ्या उत्साहाने या शुभकार्यात सहभागी झाले होते.
लग्न झाल्यानंतर वधुकडील वऱ्हाडी निघून गेले होते. वधूसोबत रिवाजानुसार एक कलवरी थांबलेली होती. या दोघींनीही लग्नाच्या मध्यरात्री घराला बाहेरून कडी लावत अंगावरील व घरातील दागिन्यांसह चारचाकी गाडीतून धूम ठोकली. नवरीने धूम ठोकल्याचे लक्षात आल्यानंतर लग्नघरी एकच गोंधळ उडाला. आपली फसवणूक झाल्याचे
लक्षात येताच वरपित्याने मध्यस्थला फोन केला असता त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे या कुटुंबाने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शिरूर तालुक्यातील सादलगाव येथेही काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना घडली होती.
शिरूर तालुक्यातून नवरीने लग्नानंतर ठोकली धूम…
चीनची नवरी झाली अहमदनगर जिल्ह्याची सून…
नवरीची अंगावरील हळद फिटण्याआधीच प्रियकरासह आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…