shirur-taluka-logo

Video: नवरा बसला बोलत अन् प्रियकराने पळवले नवरीला…

देश

नवी दिल्लीः एका विवाहसोहळ्यादरम्यान मंडपातूनच नवरीला पळून नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

प्रियकर थेट स्टेजवर चढून प्रेयसीच्या गळ्यात वरमाला घालत असल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. तशाच प्रकारे एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, लग्नमंडपात नवरा आणि नवरी खुर्चीत बसले आहेत. त्यावेळी नवरा त्याच्या बाजूला असलेल्या एका महिलेशी बोलत आहे. एक युवक पाठीमागून येतो आणि तो नवरीची मांग भरतो. इतकेच नाही तर तो तिला चक्क नवरा शेजारी असतानाच पळवूनही नेतो. विशेष म्हणजे नवरा शेजारीच बसलेला असूनही आपल्या मागून येऊन कोणी आपल्या बायकोची ५ वेळा मांग भरत असल्याचे त्याच्या लक्षातही येत नाही इतका तो बोलण्यात गर्क आहे. मांग भरल्यानंतर हातानेच चल अशी खूण करत तो तिला उठायला सांगते. नवरीही हळूवार उठते आणि चालत हळूच स्टेजच्या मागून हा नवरा तिला पळवूनही नेतो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by SHITTY HUMOURS 💀 (@shitty.humours)

दरम्यान, संबंधित व्हिडिओ पाहून नेटिझन्स व्यक्त होत आहे. संबंधित घटना कोठे घडली आहे, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकलेले नाही.

hotel matoshree ranjangaon ganpati