शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढतं असुन सध्या तालुक्यातील विविध भागात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत आहे. आज (दि 18) डिंग्रजवाडी (ता.शिरुर) येथे दुपारी दोनच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या दिसला असून येथे पाच ते सहा बिबट्यांचा वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. हे बिबटया येथील मोकाट कुत्र्यांची शिकार करत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून तातडीने पिंजरा बसवण्यात येणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी केले आहे.
डिंग्रजवाडी येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा बिनधास्त वावर मोठ्या प्रमाणात सुरू असून नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रानातील कामेही करता येत नसून महिलांनाही शेतात काम करण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच जनावरांना चारा आणणे, शेतीला पाणी देणे, फवारणी इतर शेतीची कामे बिबट्याच्या भीतीने करता येत नसून शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याने येथील शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन शेतातील कामे करण्यासाठी शेतात जावे लागत आहे.
डिंग्रजवाडी येथे तातडीने पिंजरा बसविणार…
डिंग्रजवाडी येथे बिबट्याच्या वावर असून त्याबाबत पाहणी करण्यासाठी वनरक्षक बबन दहातोंडे यांना पाठवले असून सदर परिसरात पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रात मंगळवार (दि १९ ) रोजी तातडीने पिंजरा लावण्यात येईल तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी व काही समस्या आल्यास वनविभागास तातडीने कळवावे असे आवाहन शिरुरचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी केले.
गावातील भटकी कुत्री बिबटयांच्या भक्षस्थानी…
डिंग्रजवाडी हे शेतीवर अवलंबून असलेले गाव असून येथे मोठ्या प्रमाणात जनावरे पाळण्यात येत असुन पाळीव कुत्र्याबरोबर गावात भटक्या कुत्र्यांची मोठी संख्या होती. पुर्वी गावात आठ ते दहा भटक्या कुत्र्यांचा कळप पाहायला मिळायचा. पण बिबट्यांचा वावर वाढल्यापासून गावातील भटकी कुत्री दिसायची बंद झाली असून बिबट्यांनी त्यांचा फडशा पाडला की काय अशी शंका उपस्थित होत आहे.
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…
मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…