क्राईम

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात असून, त्याचे लोकेशन सापडल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, त्याचे राजकीय नेत्यांसोबत फोटो आहेत.

आरोपी दत्ता गाडे हा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचा राजकीय व्यक्ती आणि पोलिसांशी संपर्क असायचा अशी माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे. त्यामुळेच दत्तात्रय गाडे याच्यात स्वारगेट डेपोसारख्या मध्यवर्ती ठिकाणी युवतीवर बलात्कार करण्याची हिंमत आली असावी, अशी चर्चा आता सुरु आहे. राजकीय फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडे याचा फोटो असल्याचे चित्र आहे, तर दत्ता गाडे याच्या व्हाट्सअप प्रोफाईलला शिरुरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

आरोपी दत्ता गाडे याच्या व्हाट्सअप प्रोफाईलला फोटो शिरुरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो दिसून येत आहे. माऊली कटके हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. माऊली कटके यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना तिर्थयात्रा घडवल्या. त्यामधे आरोपी दत्ता गाडे हा सहभागी झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. आमदार माऊली कटके यांनी मात्र दत्तात्रय गाडेशी आपला कोणताही संबंध नसून आपण त्याला ओळखत नसल्याचे म्हटले आहे. माऊली कटके म्हणाले, ‘मतदार संघांतील 10 हजार पेक्षा जास्त लोकांना देवदर्शन करून आणलं आहे. अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढत असतात. माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा माझा संबंध नाही. कारण अनेक कार्यकर्ते मतदारसंघात सोबत फोटो काढत असतात. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत.’

शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर हा आरोपी दत्ता गाडे याचा फोटो लावण्यात आला आहे. अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या फ्लेक्सवर गाडे याचा फोटो आल्याने आरोपी दत्ता गाडे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी गाडे याने २०१९ साली कर्ज काढून एक कार घेतली होती. या कारद्वारे तो पुणे अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत होता. दरम्यान, तो एकट्या दुकट्या वृद्ध महिलांना टार्गेट करायचा. त्यांच्या गळ्यात सोनं दिसले तर तो घरून डब्बा घ्यायचा आहे, असे सांगून निर्मनुष्य ठिकाणी गाडी घेऊन जायचा. या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देत महिलांच्या गळ्यातील सोनं काढून घ्यायचा.

याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने आरोपी गाडेला अटकही केली होती. त्यावेळी त्याच्याकडून १२ तोळे सोनं जप्त केले होते. २०२० मध्ये शिरूरजवळील कर्डे घाटात जबरी लूटमार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याला चार ते पाच महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मोकाटपणे फिरत होता. आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप डीपीवर आमदाराचा फोटो आहे. शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. आरोपी दत्ता गाडे हा गावातील लोकांना उज्जैन येथे महाकाल येथे दर्शनाला घेऊन जायचा. आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती समोर आली आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

8 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

8 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

8 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

8 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

8 तास ago