datta-gade-shirur

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

क्राईम

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे.

स्वारगेट बस स्थानक परिसरातील या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. त्यामध्ये ही युवती आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बसमध्ये नेले आणि अत्याचार केला. पीडित युवतीला दत्रात्रय गाडेने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ही तरुणी घाबरुन गेली. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावर आरडाओरड करण्याचे त्राणही तिच्यात उरला नाही.

पीडित युवती मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात आली. तिला फलटणला जायचे होते. त्यावेळी स्वारगेट परिसरात सराईत गुन्हेगार असलेला दत्तात्रय गाडे हा युवती एकटी असल्याचे पाहून जवळ आला. त्याने आगारात मधोमध उभी असलेली एसटी फलटणला जाणार आहे, असे सांगितले. सोलापुरहून स्वारगेटला उभी असलेली ही बस पुन्हा सोलापुरला जाणार असून वाटेत ती फलटणला थांबेल असे त्याने पीडित युवतीला सांगितले. हे सगळं सांगताना तो पीडित युवतीला ताई-ताई असे म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेऊन ही युवती बसमधे चढली. तिच्या पाठोपाठ दत्तात्रय गाडे देखील बसमधे चढला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने युवतीला दिली. युवती घाबरली होती. त्यानंतर ती दुसऱ्या बसने फलटणला जायला निघाली. वाटेत असताना तिने हा प्रकार मित्राला सांगितला. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

पीडित युवतीने या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार केली आहेत. या पथकांकडून दत्तात्रय गाडे याचा कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या भावाला गाठले असून त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे.

स्वारगेट बस स्थानक परिसरात मंगळवारी (ता. 25) पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. स्वारगेट डेपोतील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये पीडित आणि आरोपी दोघंही स्पष्टपणे दिसत नाहीत. बस ज्या ठिकाणी उभी आहे, त्याठिकाणी अंधार आहे. आजूबाजूला अनेक बस असल्याचे देखील दिसत आहे. स्वारगेट बस आगाराच्या मधोमध ही बस उभी असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या शिवशाही बसवर सोलापूर-स्वारगेट अशी पाटी लिहिलेली आहे. पोलिसांकडून सध्या या शिवशाही बसची तपासणी सुरु आहे.

पीडित युवती बसजवळ पोहोचली तेव्हा अंधार होता. त्यामुळे तिला बसमध्ये चढायचे की नाही, हा प्रश्न पडला. त्यावर आरोपीने म्हटले की, रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत. तू वर चढून टॉर्चने चेक कर. त्यानंतर ही युवती बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला. यानंतर आरोपीने युवतीवर केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही युवती पोलिस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

सीसीटीव्ही फूटेज समोर…
या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. ही तरुणी बसची वाट पाहत असताना आरोपी तिच्या भोवती घुटमळत असल्याचे दिसून आले. ही तरुणी बाकड्यावर बसली असताना तिच्या शेजारी एक व्यक्ती बसली होती. मात्र, ती निघून गेली. त्याच वेळी आरोपीने तिच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे.

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…