शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापुर येथे एका घराचे काम करणाऱ्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९, रा. नागापूर, ता. जि. बीड) या मिस्तरीने घरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छ्ळ करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सुरेश ढोकणे याला शिरूर पोलिसांनी तत्परतेने शोध घेत बेड्या ठोकल्या आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, २७ डिसेंबर २०२४ पासून २२ जानेवारी २०२५ रोजी पर्यंतच्या कालावधीमध्ये वेळोवेळी शिरूर तालुक्यातील काठापूर खुर्द या ठिकाणी फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या हॉलमध्ये मिस्त्री काम करण्यासाठी आलेल्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९, रा. नागापूर, ता. जि. बीड) याने अल्पवयीन १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे.

दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीस अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे हे करत आहेत.

शिरुर तालुक्यातील मलठणमध्ये किराणा व्यवसायिकाला दोघांची मारहाण

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…