शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

क्राईम

शिक्रापूरः एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी रोहन नप्ते याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीची रोहन नप्ते या युवकाशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. रोहनने पीडित मुली सोबत ओळख वाढवून तिचे काही फोटो काढले. पुढील काही दिवसांत त्याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत एका हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी अत्याचार सहन न झाल्याने पीडित मुलीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शिक्रापूर पोलिसांनी रोहन नप्ते याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक महिला पोलिस उपनिरीक्षक रोहिणी सोनावले हे करत आहेत.

शिक्रापुरच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला, उपचारापुर्वीचं मृत्यू

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

Video; शिरूर! जमिन मोजणीच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न…

शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…