आरोग्य

दही आणि ताक आपल्या आरोग्यासाठी दोन्हीपैकी अधिक चांगलं काय

दही आणि ताक हे दोन्हीही खरंतर अतिशय पौष्टिक पदार्थ. पण कधी कधी काही जणांना दही खाणं अजिबात सहन होत नाही. दही खाल्लं की लगेच सर्दी होते, ॲसिडीटी होते किंवा इतर काही त्रास होतात. त्याउलट काही जणांना मात्र दही खाल्ल्याने काहीच त्रास होत नाही. उलट दही खाल्लं की ते फ्रेश होतात. मग दही खाणं नेमकं कोणासाठी चांगलं असतं आणि ताक पिणं कोणाला फायदेशीर ठरत. या दोन्ही पदार्थांपैकी कोणता पदार्थ आपल्या तब्येतीच्या दृष्टीने आपल्यासाठी अधिक चांगला आहे हे प्रत्येकजण अगदी सहज ओळखू शकतो.

दही आणि ताक यापैकी कोणता पदार्थ तुमच्यासाठी अधिक चांगला

1) सगळ्यात पहिलं म्हणजे दही पचायला थोडं जड असतं. त्यामुळे ते रात्रीच्यावेळी खाऊ नये असा सल्ला दिला जातो. त्याउलट ताकामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्याने ते पचायला अगदी सोपं असतं. शिवाय ताकामध्ये आपण मीठ, जिरेपूड, मिरच्या, कोथिंबीर असे पचनासाठी पुरक पदार्थ घालतो. त्यामुळे ते अधिक पाचक होतं. म्हणूनच ज्यांना पचनाचा त्रास असतो अशा लोकांनीं दही खाण्याऐवजी ताक प्यावं.

2) दह्याला आपण थंड पदार्थ समजतो. पण खरंतर ते उष्ण असतं. त्यामुळे ज्यांना अॅसिडीटी, पित्त असा त्रास होतो अशा लोकांनी दही खाणं टाळावं. अशा लोकांनी ताक पिण्यास प्राधान्य द्यावं कारण ताक थंड असतं.

3) ज्या लोकांची कफ प्रकृती असते अशा लोकांनाही दही खाणं टाळावं. कारण त्यांना दह्यामुळे सर्दी, शिंका, कफ असा त्रास होऊ शकतो. त्या लोकांना ताक पिणं मात्र चालतं. ताक तुम्ही तिन्ही ऋतूंमध्ये घेऊ शकता आणि कफ, वात, पित्त अशा तिन्ही प्रकृतीच्या लोकांना चालत.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

7 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

7 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

7 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

7 तास ago