RANJANGAON

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

क्राईम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात युवकांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे घडली आहे.

आकाश प्रकाश पाडळे (वय २७, रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत महेश रामदास शेळके (वय ३२, रा. सोने सांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी सात अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.

रांजणगाव गणपती येथील लांडेवस्ती येथून महेश शेळके हा युवक २१ मे रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोनेसांगवी येथे घरी जात होता. लांडेवस्ती येथे कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो रस्त्याच्या वळणावर उलटला असल्याने महेश याने टेम्पो चालकांना टेम्पोबाबत माहिती विचारल्याने टेम्पोजवळील युवकांनी महेशला शिवीगाळ केली. त्यांनतर महेशने पहाटेच्या सुमारास आकाश पाडळे व अक्षय शेळके या दोघांना बोलावून घेतले. यावेळी कोंबड्यांचा टेम्पो क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेत होते. बाजूला एक कारदेखील उभी होती. यावेळी महेशचे मित्र आकाश व अक्षय यांनी सदर युवकांना महेशला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता तेथील युवकांनी दगड व चाकूने महेशसह दोघांवर हल्ला चढवला. यावेळी महेश शेजारी लपून बसला तर अक्षय दुचाकी घेऊन पळून गेला. आकाश हा पळून जात असताना कोंबड्यांच्या टेम्पोजवळील युवकांनी दगड व चाकूने खून केला.

दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्यास रांजणगाव पोलीसांनी केली अटक

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

जुन्नर तालुक्यातील खून प्रकरणी शिरूर तालुक्यातील एकाला अटक…