क्राईम

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला. तांत्रिक विश्लेषण, नातेवाईक व साक्षीदारांच्या चौकशीतून मृताची ओळख पटवत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात १७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्यापूर्वी एका तरुणाचा मृतदेह आढळला. अज्ञात आरोपींनी गळ्याच्या डाव्या बाजूस हत्याराने वार करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात टाकला होता. पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे कठीण होते. पोलिसांनी कपडे, वस्तू व छायाचित्रे सोशल मीडिया आणि बॅनरद्वारे प्रसारित केली. दि. १९ जुलै रोजी एल अँड टी फाटा परिसरात नातेवाईक शोध घेत असताना पोलीस शिपाई लखन शिरसकर यांनी चौकशी केली. त्यातून दि. १५ जुलैपासून बेपत्ता असलेला टुटुकुमार अजित यादव (वय २२, रा. देवचंद बिघा, थाना काको, जि. जेहानाबाद, बिहार) याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

तपासात पुसकरकुमार अरुण यादव, आयुषमान सुशील पांडे आणि सचिन मारुती हिंगेवार यांची नावे समोर आली. तिघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पुसकरकुमारला टुटुकुमार याने शेतातील वीजपंप अथवा मोटार चोरल्याचा संशय होता. तसेच टुटुकुमारचा मित्र आणि आरोपीच्या बहिणीच्या प्रेमसंबंधांना तो मदत करत असल्याचा व त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकत असल्याचा राग होता. याच रागातून तिघांनी संगनमताने खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

संबंधित कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंतराव गिरी, पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सोमनाथ कचरे, पोलिस हवालदार नितीन सुद्रिक, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, अमोल नलगे, नवनाथ नायकडे, मिलिंद देवरे, चंद्रकांत काळे, संदीप करांडे, पोलिस अंमलदार लखन शिरसकर, मच्छिंद्र निचीत, राम जाधव, नारायण वाळके, पोसई महेश डोंगरे, पोहवा तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ यांनी हि कामगिरी केली.

आपदा पथकाचे शेरखान शेख, वैभव निकाळजे, गणेश टिळेकर, श्रीकांत भाडळे, महेश साबळे, राहुल गायकवाड तसेच रुग्णवाहिकेतील अमोल नपते व रोहित थोरात यांनी मदत केली. पुढील तपास सपोनि शिवाजी भोसले करीत आहेत.

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

दारू प्यायची आहे…? चला किराणा दुकानात! शिरूर पोलिसांच्या हद्दीत गावठी दारूची खुलेआम विक्री…

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

Video: शिरूर तालुक्यात स्वीट होममधील कामगाराला बेदम मारहाण…

शिरूर! निमगाव म्हाळुंगीमध्ये जन्मदात्या मुलाकडून आईची हत्या…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago