महाराष्ट्र

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर ‘स्टेट ड्राईव्ह’मधून उपस्थित झाले प्रश्न

मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून वीज ग्राहकांच्या तक्रारी, वाढत्या वीजबिलांचा मुद्दा आणि पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांनी त्यांच्या ‘स्टेट ड्राईव्ह’ या सदरातून स्मार्ट मीटर योजनेबाबत विविध प्रश्न उपस्थित करत ग्राहकांच्या हक्कांवर भाष्य केले आहे.

लेखात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीपूर्वी ग्राहकांना पुरेशी माहिती देण्यात आली का, मीटरची कार्यपद्धती, बिलिंग प्रणाली, पीक अवर शुल्क आणि डेटा वापराबाबत स्पष्ट मार्गदर्शन झाले का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच ‘मोफत मीटर’च्या घोषणेमागील खर्च कोण उचलणार, याबाबतही स्पष्टीकरणाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लेखात वीज कायदा 2003 अंतर्गत ग्राहकांना पारदर्शक सेवा, तक्रार निवारण आणि नियमानुसार प्रक्रिया मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. नियामक आयोगांनी ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यकतेनुसार सार्वजनिक सुनावण्या घ्याव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

तंत्रज्ञानाला विरोध नसून, त्याच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, जनजागृती आणि ग्राहकांशी प्रभावी संवाद आवश्यक असल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे. वीज ग्राहकांना मीटरची कार्यपद्धती, बिलिंगची रचना आणि तक्रार निवारणाची प्रक्रिया समजावून सांगितल्यासच स्मार्ट मीटरबाबतचा विश्वास अधिक दृढ होईल, असे मत लेखातून व्यक्त करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

8 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

8 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago