ranjangaon-midc-police station
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना टेम्पो अचानक मागे आल्याने रॅम्प आणि टेम्पोच्या मध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. १९) पहाटे रांजणगाव MIDC परिसरातील ब्रिटानिया कंपनीत घडली आहे. दिलीप आत्माराम राठोड (वय ३४, रा. महागणपती हायस्कूलजवळ, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.
अभिजीत माधव मलगुंडे (वय ३१, रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप राठोड हे आयशर टेम्पो क्रं (एम एच १२ टीव्ही २४१९) यावर चालक म्हणून काम करत होते. रविवारी पहाटे त्यांनी संबंधित टेम्पो ब्रिटानिया कंपनीमध्ये माल पोहोचविण्यासाठी आणला होता. कंपनीच्या डॉकसमोर टेम्पोमध्ये माल भरल्यानंतर राठोड हे टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत होते. त्याचवेळी टेम्पो अचानक पाठीमागे सरकल्याने दिलीप राठोड हे कंपनीचा रॅम्प आणि टेम्पोच्या मध्ये अडकून गंभीररीत्या चेंगरले. पहाटे सुमारे ३ वाजता कंपनीतील कामगारांनी राठोड यांच्या मोबाईलवरुन टेम्पोमालक अभिजीत मलगुंडे यांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, या बाबतची माहिती मिळताच मलगुंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील राठोड यांना रुग्णवाहिकेतून शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, पहाटे सुमारे ४ वाजून १० मिनिटांनी डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अपघात नेमका कसा घडला, टेम्पो अचानक मागे कसा सरकला तसेच घटनास्थळी आवश्यक सुरक्षाव्यवस्था होती की नाही, याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार अजित पवार करीत आहेत.
रांजणगाव MIDC मध्ये कामगाराचा छतावरुन पडून मृत्यू; दोन महिन्यांनंतर कंत्राटदारावर गुन्हा दाखल
रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…
Video! रांजणगाव MIDC दहशतीत! कामगारांवर हल्ले आणि लूटमारीचे वाढले प्रमाण…
Video: रांजणगाव MIDC परिसरात शिरला बिबट्या…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…