Shikrapur Police Station
शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील एकाला किरकोळ कारणातून त्याच्या पुतण्याने विळ्याने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे नंदकुमार वामनराव शितोळे व ऋत्विक नंदकुमार शितोळे या बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील शामराव शितोळे हे केनॉलच्या रस्त्याने चाललेले असताना त्यांचा भाऊ नंदकुमार तेथे आला. त्याने शामराव यांना अडवून तू माझ्या मुलाला शिव्या का दिल्या? असे विचारले तेव्हा मी शिव्या दिल्या नाही असे शामराव म्हणाला. त्यावेळी ऋत्विक हा हातामध्ये विळा घेऊन तेथे आला, तो शामराव यांना मारत असताना त्यांनी एका हाताने विळा धरला मात्र ऋत्विक याने त्यांना हाताने मारहाण केली. विळा देखील शामराव यांच्या हाताला व दंडाला लागल्याने शामराव शितोळे हे जखमी झाले.
याबाबत शामराव वामनराव शितोळे (वय ५३ रा. नवोदय विद्यालय जवळ पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी नंदकुमार वामनराव शितोळे, ऋत्विक नंदकुमार शितोळे (दोघे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक भरत कोळी हे करत आहेत.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…