Shirur Police Station
शिरूरः कवठे येमाई येथे दोघांनी पोलिस असल्याचे भासवून महिलेचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
कवठे येमाई (ता. शिरुर) येथील भीमाबाई सांडभोर या गावातील एका ढाब्यासमोर उभ्या असताना दोन युवक दुचाकीहून आले त्यांनी भीमाबाई यांना आम्ही पोलिस आहोत, दोन दिवसांपूर्वी एका बाईला चाकू लावून लुटले आहे, तुमचे दागिने काढून कागदावर ठेवून पिशवीत ठेवा असे सांगत दागिने काढायला लावून कागदात ठेवून पिशवीत ठेवा असे सांगितले.
काही वेळात भीमाबाई यांनी पिशवीतील कागद पाहिला असता त्यामध्ये दागिने नव्हते तर दोघांनी पोलिस असल्याची बतावणी करुन दागिने लांबवल्याचे लक्षात आल्याने भीमाबाई सुखदेव सांडभोर (वय ६५ वर्षे रा. कवठे येमाई ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी अज्ञात दोघा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल आगलावे हे करत आहेत.
विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंगचे मिळणार प्रात्यक्षिक शिक्षण; उच्च शिक्षणासाठी ठरणार उपयुक्त शिरूर…
पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या काळाबाजारावर कारवाई होणार; पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांचे नळजोड तोडणार! पुणे :…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…
कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…